पुणे- सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी किरकोळ जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. 6 जून) सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी कोथरुड येथील सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही तरुण दारू पित बसले होते. यावेळी सोसायटीतील एक रहिवासी कुत्रा बाहेर घेऊन निघाले होते. त्याने या टोळक्याला 'येथे बसू नका' म्हणत हटकले. त्यानंतर या टोळक्याने त्या रहिवाशासमवेत वाद घातला. त्यामुळे घाबरलेला हा रहिवासी तेथून जाऊ लागला. तेव्हा एका दारुड्याने त्याच्या दिशेने बाटली फेकून मारली. यावेळी दोन तरुण भांडण सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली.
हा गोंधळ सुरू असताना तिथे माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि सोसायटीतील इतर रहिवासीही पोहोचले. पण, दारुच्या नशेत असलेले हे टोळके कोणाचेही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी सर्वांना धक्काबुक्की करत बघून घेऊ, अशी धमकी दिली. यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून कोथरुड पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दारुड्यांच्या धक्काबुक्कीत माजी आमदार मेधा कुलकर्णी किरकोळ जखमी, दोघे अटकेत - कोथरुड माजी आमदार
सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पिणाऱ्यांना हटकल्याने दारुड्यांनी एका व्यक्तीसमवेत वाद घासण्यास सुरुवात केली. ती व्यक्ती निघून जाताना एका दारुड्याने त्या व्यक्तीच्या दिशेने बाटली फेकली. त्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला. हा वाद मिटविण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, दारुड्यांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली. यात मेधा कुलकर्णींच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
घटनास्थळावरी दृश्य