पुणे- येथील पिंपरी-चिंचवडमध्ये दापोडी परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी सावत्र बाप फरार असून त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत. ही घटना काल (गुरुवारी) सायंकाळच्या सुमारास घडली असून रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
संतापजनक..! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खून करून सावत्र बाप फरार - pune crime news
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी परिसरात सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीची मोठी बहीण शाळेत तर आई कामावर गेल्याचा फायदा घेत हा अत्याचार करण्यात आला आहे.
हेही वाचा-निर्भयाच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्या, आई आशा देवींची सर्वोच्च न्यायालय आणि केंद्राकडे मागणी
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी परिसरात सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीची मोठी बहीण शाळेत तर आई कामावर गेल्याचा फायदा घेत हा अत्याचार करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनतर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. घटनेनंतर नराधम बाप फरार झाला असून त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.
दरम्यान, शाळेतून मोठी बहीण घरी आली तेव्हा घराच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. थोडा वेळ थांबून मोठ्या बहिणीने कुलूप तोडले. त्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य ओळखून भोसरी पोलिसांनी तीन पथक आरोपीच्या शोधात रवाना केली आहेत. आरोपी हा रिक्षा चालक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो पीडित मुलीच्या कुटुंबासोबत राहात होता. त्यांच्यात वाद देखील झाले होते, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.