धक्कादायक! शाळेच्या स्वच्छतागृहातच भावाच्या मित्राचा बालिकेवर बलात्कार - भावाच्या मित्राचा बालिकेवर अत्याचार
आरोपी हा पीडित मुलीच्या भावाचा मित्र आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन त्याने हा घृणास्पद प्रकार केला. आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वडगाव निंबाळकर गावातील शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आणखीही दोन ठिकाणी घेऊन जात त्याने पीडितेवर बलात्कार केला.
पुणे - पंधरा वर्षीय बालिकेवर नराधमाने शाळेच्या स्वच्छतागृहातच बलात्कार केल्याने खळबळ उडाली. धक्कादायक प्रकार म्हणजे आरोपी हा पीडितेच्या भावाचा मित्र आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेवर तीन वेळेस बलात्कार केला. पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर गावात लॉकडाऊनच्या काळात हा प्रकार घडला. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये पीडितेने तक्रार दिली असून 19 वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या भावाचा मित्र आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन त्याने हा घृणास्पद प्रकार केला. आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वडगाव निंबाळकर गावातील शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आणखीही दोन ठिकाणी घेऊन जात त्याने पीडितेवर बलात्कार केला. दरम्यान, पीडित मुलीच्या भावाला तिच्या रोजच्या वागणुकीतील बदल पाहून संशय आला. त्याने तिच्याकडे विचारणा केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.
पीडितेने तक्रार दिल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक लांडे हे करीत आहेत.