महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा खून, संशयित आरोपी फरार - Pimpri-Chinchwad Crime news

हा खून सावत्र वडिलाने केल्याचा संशय भोसरी पोलिसांना व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी फरार वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Minor girl murder in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा खून

By

Published : Dec 13, 2019, 1:23 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, खून झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत काही अघटित घडले आहे का? हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - तिरुपती ते बारामती ५५ तासात सायकलवरुन प्रवास, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याच्या अनोखा उपक्रम

तर हा खून सावत्र वडिलाने केल्याचा संशय भोसरी पोलिसांना व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी फरार वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - मंचर-बेल्हे रस्त्यावर पिकअप-रिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. मृत मुलीची बहीण शाळेतून घरी आली. तेव्हा, घराला बाहेरून कुलूप होते. त्यामुळे बराच वेळ तिने वाट पाहिली. त्यानंतर कंटाळून अखेर कुलूप तोडले आणि गंभीर घटना समोर आली. या अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details