पुणे - एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मयूर शरद शेळके (वय-21) या आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीची 15 वर्षाची मुलगी एका विद्यालयात शिक्षण घेते. तर, संबंधित आरोपी रिक्षाचालक आहे. त्याने अनेकदा पीडितेचा पाठलाग केला आहे. तसेच मैत्री करण्याच्या बहाण्याने पीडितेशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
बारामतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकतर्फी प्रेमातून केले गैरवर्तन - young girl molested in baramati
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार बारामतीत समोर आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार बारामतीत समोर आला आहे.
दि. 16 फेब्रुवारीला संबंधित अल्पवयीन मुलगी गुणवडी चौकाच्या दिशेने जात असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. आरोपीच्या विरोधात शहर पोलिसांनी विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी अधिक माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.