इंदापूर(बारामती) -एका अल्पवयीन १३ वर्षाच्या मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार (Rape on disable Girl in Indapur Pune) केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल (Walchandnagar Police Station) करण्यात आला (FIR on Three Accused) आहे. शुभांगी अमोल कुचेकर (वय २५), अनिल नलवडे, नाना बगाडे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महिला आरोपीने केली होती मदत - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अपंग आणि मतिमंद मुलीला नोंव्हेबर २०२१ मध्ये शुंभागी कुचेकर हिने फिरायला नेले होते. गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या शेतात संबंधित मुलीला पाठविल्याचा प्रकार घडला. एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारासाठी शुंभागी कुचेकर व नाना बागडे यांनी सहकार्य केल्याचे उघडकीस आले.