महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : पाटस कारखाना चौकात खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात; रस्ता दुरूस्त करण्याची मागणी - patas factory road damage

दौंड तालुक्यातील अष्टविनायक मार्गाचे काम सुरू आहे. कारखाना चौकात अजून काम सुरू झाले नाही. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Minor accident due to potholes in Patas factory chowk
पाटस कारखाना चौकात खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात

By

Published : Dec 20, 2020, 4:01 PM IST

दौंड (पुणे) -तालुक्यातील पाटस गावातील कारखाना चौकात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. यामुळे किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत आहेत. तसेच रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने वाहने गेल्यावर धूळ परिसरात पसरत आहे. येथील रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी येथील व्यावसायिक आणि नागरिक करीत आहेत.

नागरिकांची प्रतिक्रिया.
दौंड तालुक्यातील अष्टविनायक मार्गाचे काम सुरू आहे. कारखाना चौकात अजून काम सुरू झाले नाही. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाटस गावातील कारखाना चौकातून कुसेगाव-पडवी-सूपा-मोरगाव असा हा मार्ग आहे. मात्र, पाटस येथील कारखाना चौकात मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.

हेही वाचा -कोव्हॅक्सिन चाचणीचा तिसरा टप्पा; दिल्लीमध्ये मिळेनात स्वयंसेवक

दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघात -

कारखाना चौक हा वर्दळीचा परिसर आहे. येथे नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची गर्दी असते. येथे रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकी वाहने पडण्याचे प्रकार घडत आहेत. येथे दुचाकीवरून वयोवृद्ध म्हातारी खाली पडली असल्याचा प्रकार आज (रविवारी) घडला. तसेच चारचाकी वाहनांचे चाक खड्ड्यात गेल्याने बॉडी खाली घासत आहे. तसेच चौकात मोठ्या प्रमाणावर धूळ असल्याचे चित्र दिसत आहे. धुळीमुळे व्यावसायिकांना आणि नागरिकांना त्रास होत आहे.

कारखाना चौकातील रस्त्याचे काम गेले आठ ते नऊ महिने रखडलेले आहे. पावसाळ्यात रस्त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांमुळे चौकात अपघात होत आहेत. येथील खड्डे वेळीच बुजवले नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details