बारामती- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मागील वर्षी मंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनोख्या कार्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. सर्व सामान्य बद्दलची असलेली त्यांची नाळ ही कायमस्वरूपी अजून टिकून असल्याचे दिसून येत आहे. यात आपल्या आलिशान गाडीत एका वृद्ध महिलेला तिच्या घरापर्यंत सोडवण्याची घटना असो, किंवा अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी स्वतःच्या गाडीत नेल्याची घटना असो, अशा कित्येक घटना इंदापूरसह महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. आजही त्यांनी स्वतः हातात खराटा घेत केलेल्या स्वच्छतेची चर्चा इंदापूर तालुक्यात रंगत आहे.
राज्यमंत्री भरणेंनी स्वत: हाती घेतला खराटा; वालचंदनगरामध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात - भरणेंनी केली हातता झाडू घेत स्वच्छता
वालचंदनगर परिसराची गेल्या २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक वेगळी ओळख होती, सुसज्ज असे व टापटीप व गर्द हिरवळीने नटलेले वालचंदनगर गावाची ओळख होती. तसा मोठा नावलौकिक होता. मात्र औद्योगिक मंदीमध्ये येथील अनेक नागरिक स्थलांतरित झाले. व हळूहळू येथील मुलभूत सुविधाही कमी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत गेले
"आता ठरवायचं जुने वालचंदनगर पुन्हा बनवायचं" या घोषवाक्यासह वालचंद नगरमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वत: हातात खराटा घेऊन स्वच्छता करीत मोहिमेचा शुभारंभ केला. माजी उपसरपंच व सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य गायकवाड यांचा स्वखर्चातून पुढाकार-
वालचंदनगर परिसराची गेल्या २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक वेगळी ओळख होती, सुसज्ज असे व टापटीप व गर्द हिरवळीने नटलेले वालचंदनगर गावाची ओळख होती. तसा मोठा नावलौकिक होता. मात्र औद्योगिक मंदीमध्ये येथील अनेक नागरिक स्थलांतरित झाले. व हळूहळू येथील मुलभूत सुविधाही कमी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत गेले. हे गेलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी गायकवाड यांनी ही मोहीम हातात घेतली आहे. स्वतः पुढाकार घेऊन सध्या स्वखर्चातून परिसरातील स्वच्छता करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, विशेष म्हणजे यावेळी भरणे यांनी स्वतः हातात खराटा घेत स्वच्छता करत या मोहिमेचा शुभारंभ केला.