पुणे - 'निसर्ग' चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घरे, झाडे, विजेच्या खांबाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम पट्टा सध्या अंधारात आहे. अनेक शेतकऱ्यांची खाचरे पाण्याने तुडूंब भरल्याने भाताच्या दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मुळशी तालुक्याला भेट दिली.
मुळशीमध्ये वादळामुळे मोठे नुकसान; वादळग्रस्त भागाला मंत्री अस्लम शेख यांची भेट - Aslam shaikh visit mulashi
मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची मंत्री अस्लम शेख आज पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. भांबर्डे व नुकसानग्रस्त गावातील परिस्थितीची पाहणी करून येथील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले.
मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची मंत्री अस्लम शेख आज पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. भांबर्डे व नुकसानग्रस्त गावातील परिस्थितीची पाहणी करून येथील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले. चक्रीवादळामुळे लोकांच्या घरांवरील पत्रे आणि छप्पर उडून गेले आहेत. अशा नुकसानग्रस्त घरांवर लवकरात लवकर पत्रे व छप्पर बसवण्यात येतील, असे सांगत त्यांनी प्रशासनाला याकामी सूचना दिल्या आहेत. तसेच या भागातील वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत केरोसिनचा पुरवठा करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.