महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्नरमधील भर कार्यक्रमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार निघून गेले; पाहा VIDEO - जुन्नर राष्ट्रवादी शिवसेनेत वाद

जुन्नर तालुक्यातील पारगावात नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला.

ABDUL SATTAR
भर कार्यक्रमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार निघून गेले

By

Published : Aug 28, 2021, 7:56 PM IST

Updated : Aug 28, 2021, 8:13 PM IST

पुणे/जुन्नर - जुन्नर तालुक्यातील पारगावात नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला. याच वादातून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भर कार्यक्रमातून काढता पाय घेतला. "माझ्यामुळेच तुमची अडचण झाली, त्यामुळे मीच निघून जातो" असे म्हणून अब्दुल सत्तार भर कार्यक्रमातून निघून गेले.

भर कार्यक्रमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार निघून गेले

हेही वाचा -राजनाथ सिंहांच्या 'त्या' वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून निषेध, म्हणाले खरा इतिहास समोर आला पाहिजे

  • इमारतीच्या उद्घाटनावरून वाद -

पारगावात नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांना निमंत्रण दिले होते. मात्र, दिलीप वळसे-पाटील या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. अब्दुल सत्तार या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादीकडून येणारे आमदार अतुल बेनके वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे शिवसेनेने या इमारतीचे उद्घाटन करून घेतले.

  • भर कार्यक्रमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार निघून गेले -

हाच राग मनात धरून राष्ट्रवादीकडून आमदार अतुल बेनके कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करत पुन्हा एकदा त्याच इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व प्रकाराने संतप्त झालेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'आमची तुम्हाला अडचण झाली' असे म्हणत व्यासपीठ सोडले आणि ते निघून गेले. या प्रकारानंतर परिसरात राजकीय चर्चांना पेच फुटला आहे.

हेही वाचा -नारायण राणेंचे मानसिक स्वास्थ्य ठीक व्हावे म्हणून शिवसैनिकांनी प्रार्थना करावी - संजय राऊत

Last Updated : Aug 28, 2021, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details