पुणे - दुष्काळ, अवकाळी पाऊस, पूर अशा वेगवेगळ्या संकटावर शेतकरी नेहमीच मात करण्यासाठी धडपड करत असतो. आताही कोरोनोचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर उभे राहिले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी घरात बसण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कष्टकरी बळीराजा शेतात राबून कोरोना विरोधात लढणाऱ्यांसाठी धान्य पिकवतो आहे. पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सध्या उन्हाळी बाजारी मोठ्या जोमात आली आहे. त्यामुळे धान्य आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टातून उभी राहिली डौलदार बाजरी - Pune Millet crop
कोरोनावर मात करण्यासाठी घरात बसण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कष्टकरी बळीराजा शेतात राबून कोरोना विरोधात लढणाऱ्यांसाठी धान्य पिकवतो आहे. पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सध्या उन्हाळी बाजारी मोठ्या जोमात आली आहे.
खेड आणि शिरुर तालुक्याला वरदान ठरलेली चासकमान, भामा-आसखेड, कळमोडी ही तीन धरणे, जुन्नरमधील कुकडी, आंबेगावचे डिंबे धरण या वर्षी संपुर्ण भरले होते. यंदा कालव्यातून गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक शेतक-यांनी उन्हाळी बाजरीची लागवड केली. सर्वसाधारण तीन महिन्यांत बाजरीचे पीक काढणी योग्य होत असते. दहा पंधरा दिवसांनी बाजरीला पाणी दिले जाते. आता ही बाजरी डौलदार फुलली असुन चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकऱयांना आहे.
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात. उन्हाळी बाजरीपासून मिळणारी वैरण देखील चांगल्या प्रतीची मिळते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठीची वणवण थांबते. उन्हाळी बाजरी घेण्यावर शेतकरी जास्त भर देत असतो.