महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट; शेतकरी चिंताग्रस्त - दुध उत्पादक शेतकरी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सांगली,सातार आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. राज्यात सध्या दुधाचा टंचाई जाणवत असून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र दुधाचे उत्पादन घटले आहे.

दुध उत्पादनातील घट झाल्याने शेतकरी चिंतेत

By

Published : Aug 27, 2019, 5:10 PM IST

Updated : Aug 28, 2019, 9:21 AM IST

पुणे -गेल्या काही दिवसांपासून राज्यात सांगली,सातार आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. राज्यात सध्या दुधाची टंचाई जाणवत असून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन घटले आहे.

पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट

वाचा -स्वातंत्र्यदिनीच हिंगोलीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे याचा परिणाम दुध उत्पादनावर झाला आहे. सततच्या पावसामुळे जनावरांना खाण्यायोग्य चारा मिळणे कठीण झाले आहे. तसेच वातावरण बदलाचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. परिणामी दुभत्या जनावरांवरांचे दुधाची क्षमता कमी होत आहे.

शेतकरी दररोज पहाटे उठून आपल्या मुलाबाळांप्रमाणे जनावरांची काळजी घेत असतो. त्यांना वेळेवरती चारा,पाणी आणि खुराक देत असतात. परंतू, दुधाचे उत्पादन घटले की, शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतो. परिणामी खर्च वाढतो आणि उत्पादन घटते. त्यामुळे याचा तोटा मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

वाचा -दुष्काळग्रस्त शेतमजुरांचे भिवंडीत स्थलांतर; पोटाची खळगी भरण्यासाठी गुंतले नालेसफाईच्या कामात

वातावरणातील या बदलामुळे साधारणता प्रत्येक गाईचे दुध २० ते २५ टक्क्यांनी घटत आहे. या उत्पादनातील घट कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मुरघासासारखे खाद्य बनवून ते पावसाळ्यात दुध देणाऱ्या जनावरांना खाऊ घालावा. तसेच गाईंना वेळेवरती लसीकरण करावे. असे पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.

Last Updated : Aug 28, 2019, 9:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details