पुणे: परराज्यातील दुग्ध संस्थांची आक्रमक स्पर्धा आणि विक्रेता ते ग्राहक यांच्यातील दूध दरातील मोठ्या फरकाचा दुष्परिणाम राज्यातील दुग्ध व्यवसायावर होतो आहे. (Milk Production In Maharashtra). त्यामुळे राज्यातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेले शेतकरी, दुग्ध संस्था आणि ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. (milk producers in trouble). याचा थेट परिणाम पुणे शहर व जिल्ह्यातील दूध व्यवसायावरही झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आज राज्यातील प्रमुख दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली. (meeting of dairy organizations).
Milk Production In Maharashtra: महाराष्ट्रातील दुधावर परराज्यातील कंपन्यांचा डोळा, राज्यातील दुध उत्पादक अडचणीत - milk producers in maharashtra in trouble
परराज्यातील दुग्ध संस्थांची आक्रमक स्पर्धा आणि विक्रेता ते ग्राहक यांच्यातील दूध दरातील मोठ्या फरकाचा दुष्परिणाम राज्यातील दुग्ध व्यवसायावर होतो आहे. (Milk Production In Maharashtra). त्यामुळे राज्यातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेले शेतकरी, दुग्ध संस्था आणि ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. (milk producers in trouble).
इतर राज्यात शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान: राज्यात गेल्या वर्षभरापासून इतर राज्यातील दूध कंपन्या येऊन जास्त दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत आहेत. या कंपन्या प्रामुख्याने गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील आहेत. याचा फटका राज्यातील स्थानिक दुग्ध संस्थांना बसतो आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच गोवा या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे तेथील दुग्ध संस्था स्थानिक शेतकऱ्यांकडून अल्प दरात दूध खरेदी करतात.
त्या कंपन्या वाचलेल्या पैशांचा वापर महाराष्ट्रातील दूध अधिक भावाने खरेदी करण्यासाठी करतात. परिणामी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी कमी तर, कधी जास्त असा असमांतर दर मिळू लागल्याने राज्यातील दूध व्यवसाय अस्थिर होऊ लागला आहे. याचा मोठा फटका दूग्ध संस्था, उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांनाही बसतो आहे.