पुणे- ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधित महिलेने बाळाला जन्म दिला आहे. सुदैवाने नवजात बाळाला कोरोनाची बाधा झालेली नाही. परंतु, आई कोरोनाबाधित असल्यामुळे या बाळाला आईजवळ घेऊन जाता येत नसल्याने त्याला आईचे दूधही देता येत नाही. अशावेळी ससूनमध्ये असलेल्या मिल्क बँकेची मदत झाली आहे. मिल्क बँकेत जमा असलेले दूध या बाळाला दिले जात आहे.
ससून रुग्णालयात सध्या दीड ते दोन वर्षांची पाच लहान मुले आहेत. त्यांना आईजवळ जाता येत नाही. अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुले कोरोनाबाधित असली तरी त्यांच्यातील लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. आईपासून दूर असलेल्या या मुलांना 'मिल्क बँके"तूनच दूध दिले जात आहे. याशिवाय मुलांना एका जागी ठेवण्यासाठी काही गोष्टीत रमवणे गरजेचे असते. यासाठी विविध खेळणी, रंग, पुस्तकांची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने केली आहे.
मिल्क बँक म्हणजे काय ?