महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Milind Ekbote FIR : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल - शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे

Milind Ekbote FIR : हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह चौघांवर पुण्यात गुन्हा दाखल (Hindutva leader Milind Ekbote Booked) करण्यात आलाय. दोन समाजात तेढ निर्माण होईल असं चितावणीखोर भाषण (Milind Ekbote Provocative Speeches) केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By PTI

Published : Sep 26, 2023, 7:03 AM IST

Updated : Sep 26, 2023, 7:43 AM IST

पुणे : Milind Ekbote FIR : दोन समाजात तेढ निर्माण होईल असं चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Hindutva leader Milind Ekbote Booked) करण्यात आलाय. पुण्यातील एका आंदोलनादरम्यान एकबोटे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याची तक्रार दाखल झाली होती.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपासह काही हिंदुत्ववादी संघटनांनी 4 सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. एका मंदिराजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. आयोजकांनी आंदोलनासाठी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली नव्हती. या आंदोलनादरम्यान एकबोटे आणि अन्य तीन कुणाल कांबळे, किरण शिंदे आणि विशाल पवार यांनी प्रक्षोभक भाषण केलं होत्ं. या भाषणामुळं दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता होती.

पुण्यात गुन्हा दाखल : मिलिंद एकबोटे यांच्यावर 141, 153 आणि 188 यासह आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भातला अधिक तपास पोलीस करत आहेत.

आधीही झाला होता गुन्हा दाखल : पुण्यातील नातूबाग मैदानात समस्त हिंदु आघाडी संघटनेतर्फे 19 डिसेंबर 2022 रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील भाषणात एकबोटे यांनी दोन धर्माच्या भावना दुखावल्या जातील, तसेच धार्मिक श्रद्धांचा अपमान करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतुनं चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -"मिलिंद एकबोटेंना वढू गावात जाण्यास बंदी घालावी"

Last Updated : Sep 26, 2023, 7:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details