पुणे-सासवड येथे मंगळवारी सीताराम बाबा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे कार्यकर्त्यांसह आले होते. यावेळी एकबोटे यांनी मारुती मंदिरातील कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. यादरम्यान पंडित मोडक यांनी कार्यकर्त्यांसह तेथे येऊन एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सासवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद एकबोटे यांना पुण्यातील सासवडमध्ये मारहाण, गोशाळेवरून उद्भवला वाद - beat
मंगळवारी रात्री सासवड येथे एकबोटे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी पंडित मोडक यांनी कार्यकर्त्यांसह येऊन एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
मिलिंद एकबोटे
सहायक फौजदार जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित मोडक यांची झेंडेवाडी येथे गोशाळा आहे. मात्र, गोशाळा चालविण्याची मोडक यांची पद्धत चुकीची असल्याचा एकबोटे यांचा समज आहे. यावरून मिलिंद एकबोटे आणि मोडक यांच्या मागील काही वर्षांपासून मतभेद आहेत.
याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांनी रात्री उशिरा सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सासवड पोलीस करीत आहेत, अशी माहिती सहायक फौजदार जगताप यांनी दिली.
Last Updated : May 8, 2019, 2:34 PM IST