पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्य व परराज्यातील कामगार व नागरिकांचा चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील परिसरात मोठ्या संख्येने अडकून होते. दरम्यान राज्य सरकारने या नागरिकांना आपल्या गावाला जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर, नागरिकांच्या कोरोना संसर्गासंबधी आरोग्य चाचण्या व इतर माहिती संकलीत करुन राज्याअंतर्गत 9 बस व परराज्यासाठी 2 बस खेड तालुक्यातून रवाना करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
खेड तालुक्यात चाकण, सेझ परिसरात एमआयडीसी आहे. येथे राज्याच्या अनेक भाग तसेच परराज्यातील कामगार आहेत. लॉकडाऊन काळात अडकून पडलेल्या अशा कामगारांना इच्छेनुसार त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्याचे कामकाज सुरू आहे. प्राप्त झालेले ऑनलाईन प्रस्ताव पोलीस कमिशनर कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत.