महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सणसवाडीत मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय मजुराचा खून - migrant-workers murder

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लोचिंग मांझी असे आहे. तो मुळचा बिहारचा रहिवासी असून सद्या तो शिरूर तालुक्यातील डिग्रजवाडी येथे राहत होता.

परप्रांंतीय मजुराचा खून

By

Published : Apr 28, 2021, 3:39 PM IST

पुणे -शिरुर तालुक्यात असलेल्या डिग्रजवाडी येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हा व्यक्तीचा डोक्यात मोठा दगड घालून खून करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. हा मृतदेह हा गावातील साठेवस्तीच्या कॅनॉलमध्ये आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत व्यक्ती मूळचा बिहारचा -

पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लोचिंग मांझी असे आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी असून सध्या तो शिरूर तालुक्यातील डिग्रजवाडी येथे राहत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details