चाकण औद्योगिक वसाहतीतून परप्रांतीय कामगार रवाना, प्रशासनाकडून २२ बसेसची व्यवस्था
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कामगार वर्गाला आपल्या मुळगावी पोहोचण्याची ओढ लागली असून आपल्या कुटुंबासमेवत मिळेल त्या सुविधा घेत आपल्या राज्यात जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या परतीसाठी प्रशासन मेहनत घेत असून गुरुवारी विविध आगारातून 22 बस मागविण्यात आल्या होत्या या बसेसच्या माध्यामातून कामगारांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यत सोडण्यात येत आहे.
पुणे - लॉकडाऊनमुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार परतीच्या प्रवासाला लागला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतून विविध राज्यात जाणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यत सोडण्यासाठी गुरुवारी 22 एसटी बसेस चाकण मार्केट यार्डमधून रवाना करण्यात आल्या. ही माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली..
चाकण औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या परतीच्या प्रवासासाठी प्रशासन मागील आठ दिवसांपासून दिवसरात्र मेहनत घेत असून कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य तपासणी व जेवण पाण्याची व्यवस्था करुन त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी मदत करत आहेत. गुरुवारी विविध आगारांतून 22 बस मागविण्यात आल्या होत्या या बसेसच्या माध्यामातून कामगारांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यत सोडण्यात येत आहे. त्यामुळे पायपीट करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळला आहे.
कामगार वर्गाला आपल्या मुळगावी पोहोचण्याची ओढ लागली असून आपल्या कुटुंबासमेवत मिळेल त्या सुविधा घेत आपल्या राज्यात जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यातच चाकणमधून 22 बसेस रवाना करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सुचित्रा आमले यांनी दिली.