पुणे- राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहे. पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय? या भीतीने पुण्यात काम करणारे परप्रांतीय नागरिक पुन्हा आपापल्या गावाला निघाले आहे. राज्यात दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. पुन्हा जर लॉकडाऊन लागला तर मागच्या वर्षी प्रमाणे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागेल. भैया क्या करे रुक के.. ना पैसा है ना काम.. अगर रुक गये और लॉकडाऊन लगा तो फिर वही तकलीफ म्हणून आत्ताच हे परप्रांतीय आपल्या गावाला निघाले आहे.
पुन्हा तो त्रास नको...म्हणून गावाला चाललोय
मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. तो भयावह अनुभव पुन्हा आम्हाला नको. कारण आम्ही थांबल्यावर ना मालक ना प्रशासन कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही परत आमच्या गावाला जात आहो, अशी प्रतिक्रिया देखील काही परप्रांतियांनी दिली. आता कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण जर पुढे लॉकडाऊन लावले तर आम्ही करायचे काय, म्हणून आम्ही परत आमच्या गावाला जात आहो, असेही यावेळी परप्रांतीय नागरिक म्हणाले.
भैया बहोत तकलीफ हुई..
मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आम्हाला अनेक समस्याना सामोरे जाव लागले. कोणीही आमच्या मदतीला आलं नाही. म्हणून आत्ता जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही करायचं काय. त्यावेळेस एक एक वेळ जेवण करायचे, कोणी काही दिलं तर ठीक नाहीतर असेच दिवस काढावे लागत होते. म्हणून आत्ताच गावाला जात आहोत.
इतर गाड्यांना गर्दीच नाही फक्त बिहार, पटना, दिल्लीसाठी गर्दी
राज्यात सातत्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पुण्यातील रेल्वे स्थानक येथून 130 हुन रेल्वे दिवसभरातुन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ये -जा करत आहे. लॉकडाऊन लागणार या भीतीने परप्रांतीय आपापल्या गावाला जात आहे. पुणे स्टेशन येथून सोडण्यात आलेल्या या गाड्यांमध्ये फक्त बिहार, पटना आणि दिल्लीच्या गाड्यांनाच गर्दी होत आहे. इतर गाड्यांना मात्र काहीच गर्दी होत नाहीये.
पुण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार करतात काम
क्या करेंगे रुक के भैया..? ना पैसा ना काम, कामगार चालले आपल्या गावाला - पुणे रेल्वे स्टेशन
मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. तो भयावह अनुभव पुन्हा आम्हाला नको. कारण आम्ही थांबल्यावर ना मालक ना प्रशासन कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही परत आमच्या गावाला जात आहो, अशी प्रतिक्रिया देखील काही परप्रांतियांनी दिली. आता कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण जर पुढे लॉकडाऊन लावले तर आम्ही करायचे काय, म्हणून आम्ही परत आमच्या गावाला जात आहो, असेही यावेळी परप्रांतीय नागरिक म्हणाले.
पुणे मजूर
पुण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक काम करत असतात. बांधकाम विभाग, हॉटेल तसेच मजूरी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे परप्रांतीय मजूर काम करत आहे. अनेक कामगार मागच्या लॉकडाऊनमध्ये गेले ते परत आलेच नाही. म्हणून जे काही कामगार होते ते परत पुन्हा आपल्या गावाला परत जात आहे.