पुणे- राज्यात पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 13 आणि 14 तारखेला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - pune news
विदर्भ, कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर 14 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पंधरा तारखेला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 16 आणि 17 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे, तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातही 13 तारखेला हलक्या स्वरूपात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.