पुणे - शहरातील स्वारगेट परिसरातील एका शाळेच्या मैदानावर पुरुषाचे गुप्तांग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेट पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरू केला आहे.
पुण्यात शाळेच्या मैदानावर आढळले पुरुषाचे गुप्तांग - found
स्वारगेट परिसरातील एका शाळेच्या मैदानावर पुरुषाचे गुप्तांग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेट पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरू केला आहे.
पुण्यात शाळेच्या मैदानावर आढळले पुरुषाचे गुप्तांग
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसरातील एका शाळेच्या मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना हे गुप्तांग दिसले. त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना याची तत्काळ माहिती दिली. त्यानंतर शाळा प्रशासनाने स्वारगेट पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या स्वारगेट पोलिसांनी फॉरेंन्सीक लॅबला पाचारण केले होते. त्यानंतर फॉरेंन्सिक लॅबने हे गुप्तांग ताब्यात घेऊन डिएनए टेस्टसाठी पाठवले आहे.