पुणे- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून अपेक्षा आहे की, अजित पवार सोबत येथील म्हणून ते सारखे म्हणत आहेत, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढील निवडणुका महायुती सोबतच
आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत 26 जानेवारीपर्यंत 2 लाख सभासद करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायती आणि येणाऱ्या सर्व निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीबरोबरच लढणार आहे, अशी चर्चाही करण्यात आली आहे. तशी चर्चा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर करण्यात येणार आहे, असे यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील वीस-पंचवीस वर्षे कोल्हापूरला परत जात नाहीत. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मी परत कोल्हापूरला जाणार आहे. यावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. चंद्रकांत पाटील अजून वीस-पंचवीस वर्षे तरी कोथरूडवरून कोल्हापूरला परत जात नाही. त्यांना दिलेले मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत ते परत जाणार नाहीत, चंद्रकांत पाटील यांना भारतात सर्व ठिकाणी भाजप यावे हे मिशन देण्यात आले आहे, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले.
शेतकरी आंदोलन राजकीय झाले