महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यापुढे लॉकडाऊन नाही - राजेश टोपे - पुणे लेटेस्ट न्यूज

पुणे, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही यांच्यासह पुण्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित उपस्थित होते.

Meeting in the presence of Sharad Pawar on the background of Corona in pune
यापुढे लॉकडाऊन विषय नाही - राजेश टोपे

By

Published : Jun 26, 2020, 7:36 PM IST

Updated : Jun 26, 2020, 7:52 PM IST

पुणे - पुणे, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही यांच्यासह पुण्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित उपस्थित होते. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, यापुढे लॉकडाऊन विषय नाही. ज्या भागात कोरोना वाढत आहे, त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील, असेही टोपे म्हणाले.

जुलै, ऑगस्टमध्ये पुणे मुबंईहून लोक गेल्याने ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू शकते. मला काळजी कोरोना संख्या वाढण्याची नाही तर मृत्यूची आहे. त्यामुळे मृत्यू संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे टोपे म्हणाले.

  • बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
  • पुणे-पिंपरीतील कोरोनाच्या स्थितीवर सविस्तर चर्चा झाली.
  • हॉस्पिटल संख्या, त्यातील बेड संख्या, खासगी हॉस्पिटल आकारत असलेले दर यावरही चर्चा झाली.
  • कोरोना रुग्णाचे लवकर निदान झाले पाहिजे. लक्षण लपवू नका, प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे टोपे म्हणाले.
    यापुढे लॉकडाऊन नाही - राजेश टोपे
  • हॉस्पिटलमधील बेडमध्ये जुलै महिन्यापर्यंत अडचण येणार नाही, संख्या वाढत राहिली तर उपाय करावे लागतील.
  • तसेच 80-20 या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये दर कसे आकारले जात आहेत, यावर लक्ष दिले जाईल.
  • वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरज पडली तर, हॉस्पिटल व आयसीयू तयार करता येऊ शकतील.
  • जे हॉस्पिटल जास्त चार्ज घेतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जी खासगी हॉस्पिटल बंद आहेत, त्यांना सुरू करण्यास सांगितले जाईल.
  • टेस्टिंगबाबतीत 24 तासांत रिपोर्ट मिळाला पाहिजे. टेस्टिंग वाढल्या पाहिजेत. नवीन पद्धतीचा वापर केला पाहिजे. 1 लाख टेस्ट करता येऊ शकतील, त्यासाठी दोन्ही महापालिकेने प्रयत्न केले पाहिजेत.
  • प्रत्येक खासदार-आमदारांनी त्या-त्या भागांतील जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या संपर्कात राहणे गरजेच आहे.
  • सर्वात जास्त टेस्टिंग मुबंई, त्यानंतर पुण्यात होत आहेत. जो आरोप केला जातोय तो खोटा असून, मृत्यूदर दडवले जात नसल्याचे टोपे यावेळी म्हणाले. यात राजकारण होण्याचे कारण नाही. थोडा आकडा पुढे मागे झाला असेल, पण मृत्यूंचा आकडा लपवला नाही.
  • जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाचा आकडा वाढू शकतो, त्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू. लॉकडाऊन राहणार नाही
Last Updated : Jun 26, 2020, 7:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details