महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Meera Borwankar Book : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांचा 'दादां'वर गंभीर आरोप, पुस्तकात केला 'हा' मोठा खुलासा - मीरा बोरवणकर पुस्तक

Meera Borwankar Book : अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी येरवडा येथील तीन एकर जमीन एका खासगी बिल्डरला दिली, असा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलाय. त्यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात अजित पवारांवर आणखी बरेच आरोप केले. वाचा पूर्ण बातमी..

Meera Borwankar Book
Meera Borwankar Book

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 5:46 PM IST

पुणे Meera Borwankar Book : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर यांनी अजित पवारांचं थेट नाव घेतलं नाही. त्यांनी पवारांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री 'दादा' असा केलाय. पुण्याच्या येरवडा भागात असलेल्या पोलिसांच्या तीन एकर जमिनीप्रकरणी बोरवणकर यांनी हे आरोप केले आहेत.

काय आरोप केले :मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे आरोप केले. पुण्याच्या येरवडा येथील तीन एकर जमीन तत्कालीन पालकमंत्र्यांनी एका खासगी बिल्डरला दिली, असा आरोप बोरवणकर यांनी केला आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचं कार्यालय होणार होतं, असा दावाही या पुस्तकात करण्यात आलाय. 'ही तीन एकर जमीन पोलिसांच्या घरांसाठी आणि कार्यालयांसाठी राखून ठेवण्यात आली होती. मात्र तत्कालीन पालकमंत्री 'दादा' यांनी तिचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मी या जमिनीच्या लिलावास विरोध केला होता', असं बोरवणकर यांनी म्हटलंय.

अजित पवारांनी आरोप फेटाळले : हे प्रकरण २०१० मधील आहे. तेव्हा अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तर आयपीएस मीरा बोरवणकर ह्या जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त होत्या. या प्रकरणावरून आता विरोधी पक्षांनी अजित पवारांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. अजित पवार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. लिलावाच्या निर्णयाला मी विरोध केला होता, असं अजित पवार यांनी म्हटलंय. हे पुस्तक रविवार (१५ ऑक्टोबर) पासून बाजारात उपलब्ध होणार आहे. पॅन मॅकमिलन पब्लिशिंग हाऊसनं या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार - शरद पवार
  2. Ajit Pawar vs Sharad Pawar Dispute :अजित पवारांचं जनतेला भावनिक पत्र, शरद पवार गटाची खोचक टीका
  3. Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीतील खलबतं चव्हाट्यावर; शरद पवारांचा राजीनामा स्टंटबाजी? जाणून घ्या, राजकीय विश्लेषकांचं मत

ABOUT THE AUTHOR

...view details