महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाठीत खंजीर खुपसला तरी पक्षनिष्ठा कायम, मेधा कुलकर्णी झाल्या भावनिक - शिवसेना-भाजप युती

तिकीट नाकारल्याने दुःख झाले आहे. मात्र, पक्षाच्या विरोधात जाणार नाही. अनेकजण वावड्या उठवत आहेत. कुठल्या पक्षाचा पदाधिकारी काय म्हणाला? कोणी काय ऑफर दिली? हे मला माहिती नाही. मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

मेधा कुलकर्णी

By

Published : Oct 2, 2019, 10:05 PM IST

Updated : Oct 2, 2019, 11:21 PM IST

पुणे- माणूस आहे दुःख होणारच, माझ्या पाठीत खंजीर खुपसला तरी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाचाच जयजयकार करेन, चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य कोथरूडमधून मिळवून देऊ. हा मतदारसंघ माझी मालमत्ता नाही. मात्र, इथे पक्षाची काहीही ताकत नसताना मी माणसे जोडली. म्हणून हा माझा मतदारसंघ असल्याचे सांगते, असे सांगत कोथरूडमधून तिकीट नाकारलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपण पक्षासोबतच असल्याचे आश्वासन दिले.

पक्षावरील निष्ठा कायम - मेधा कुलकर्णी

हेही वाचा - काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची बंडखोरी; अपक्ष लढण्याचे केले जाहीर

कोथरूडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. तिकीट नाकारल्याने दुःख झाले आहे. मात्र, पक्षाच्या विरोधात जाणार नाही. अनेकजण वावड्या उठवत आहेत. कुठल्या पक्षाचा पदाधिकारी काय म्हणाला? कोणी काय ऑफर दिली? हे मला माहिती नाही. मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही. पक्षासाठी अनेक अडचणी सोसून कोथरुडमध्ये काम केले आहे.

हेही वाचा - ...घरात लक्ष्मीचा वास राहावा म्हणून नागरिक पाळतात 'ही' प्रथा

तिकीट नाकारले गेले याचे कार्यकर्त्यांना वाईट वाटले. मात्र, एवढा मोठा ताकतवर नेता कोथरूडचे प्रतिनिधित्व करतो हे कोथरूडचे भाग्य आहे. चंद्रकांत पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ, असे आश्वासन मेधा कुलकर्णी यांनी यावेळी दिले.

Last Updated : Oct 2, 2019, 11:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details