पुणे :सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गोवर आजाराचे रुग्ण वाढत चालले (Measles infection rate 4 times faster than covid) आहे. राज्यात साडे सहा हजार गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले. यात 503 रुग्ण निश्चित झाले आहे. राज्यातील मुंबई, भिवंडी, आणि मालेगांव येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहे. गोवर हा आजार कोविडपेक्षाही 4 पट वेगाने संसर्ग होणारा असून आत्तापर्यंत जे काही रुग्ण आढळून आले आहेत, यात बहुतांश रुग्णांचे लसीकरण पूर्ण न झालेले दिसून आले (Measles infection rate) आहे.
संसर्गजन्य आजार :गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलामध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेला सारख्या सर्व आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत (Measles infection) आहे.
राज्यात २६ उद्रेक :या वर्षी राज्यात गोवरचे २६ उद्रेक झालेले असून सदर उद्रेक मुंबईत १४, भिवंडी येथे ७ तर मालेगाव मनपा येथे ५ असे झाले आहेत. मुंबईमधील ८ वॉर्डस हे सर्वाधिक गोवर प्रभावित असून एम इस्ट वॉर्डमध्ये सर्वाधिक म्हणजे ५ उद्रेक झाले आहेत. तर ३ उद्रेक एल बोर्ड मध्ये झाले आहेत. तसेच मुंबईत ८ संशयित गोवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील रुग्ण एम इस्ट वॉर्डमधील तर १ रुग्ण एल वॉर्डमधील आहे. यातील फक्त एका बालकाने गोवरचा एक डोस घेतला आहे. उर्वरित बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेली नाही.
लसीकरण नाही :गोवर हा आपल्याकडे प्राधान्याचा विषय आहे. हे उद्दिष्ट अगदी जवळ आलेले असताना राज्यात गोवरची रुग्ण संख्या ही वाढत चालली आहे. हे फक्त राज्यात नव्हे, तर भारत भर याचा उद्रेक होत असून ते आत्ता 5 पटीने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळून आलेले आहे. त्यामध्ये 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. गोवर लहान मुलांसाठी एक नंबरचा शत्रू असून त्यासाठी लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. दोन वर्षाखालील मुलांना गोवरचे दोन डोस दिले जातात. आणि हे दोन्ही डोस घेतलेल्या मुलांना गोवर होण्याची शक्यता खूपच कमी असते. जरी हा आजार झाला तरी तो खूप सौम्य स्वरूपाचा असतो. सध्या राज्यात ज्या परिसरात गोवरचे रुग्ण आढळून येत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नाहीय. त्यामुळे येथील नागरिकांनी लसीकरणाला महत्त्व दिले पाहिजे. अशी माहिती यावेळी राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे (Dr Pradeep Awte) यांनी दिली.