पुणे -आज सादर केलेला अर्थसंकल्प हा चांगला अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) असल्याचं मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंड्रस्ट्री आणि ऍग्रीकल्चर संस्थेच्या विविध मान्यवरांनी व्यक्त केलं आहे. ( MCCI Pune Reactions on Union Budget 2022 ) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Finance Minister Nirmala Sitaraman ) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा केल्या असून महिला शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. आजच्या अर्थसंकल्पाबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंड्रस्ट्री आणि ऍग्रीकल्चर संस्थेच्या विविध मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
सुक्ष्म लघु उद्योगांसाठी भरीव मदत -
आज सादर केलेला अर्थसंकल्प हा चांगला अर्थसंकल्प म्हणावं लागणार आहे. याचे कारण म्हणजे, यात जीडीपीमध्ये एक मोठी वृद्धी दाखवण्यात आलेली आहे. दुसरे कारण म्हणजे पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. 5.5 लक्ष कोटींपासून ते 60.5 लक्ष कोटीपर्यंत गेलेली आहे आणि हे 35 टक्के वाढीमुळे पायाभूत सुविधामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे आणि आर्थिक चक्र अधिक गतीने फिरायला मदत होणार आहे. तसेच मागच्या वर्षी वित्तीय तूट ही 9.2 टक्के होती. यावर्षी 6.9 टक्के असेल आणि येत्यावर्षी आणखी कमी होऊन ती 6.4 टक्के होणार आहे. तसेच या अर्थसंकल्पात सुक्ष्म लघु उद्योगांसाठी भरीव मदत करण्यात आलेली आहे, असे मत यावेळी एमसीसीआयचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा -Budget Sessions : स्वतंत्र भारतातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रवास... एक नजर
अर्थसंकल्पात इनडायरेक्ट टॅक्सबाबत जी काही घोषणा करण्यात आलेली आहे त्याबाबत वामन पारखी म्हणाले की, इनडायरेक्ट टॅक्समध्ये जीएसटी आणि कस्टम हे दोन बदल होतात. जीएसटीत बदल हे वर्षभर होत असतात. ते बजेटचं भाग नसून काही लॉमधील भाग असतात. तर ते सविस्तर बघावं लागणार आहे. अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे ती म्हणजे 1 लाख 40 हजार कोटी जानेवारीमधील महसूल हा डिसेंबरमधील आहे. तो आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे. यामुळे असे स्पष्ट होत आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यात आता सुधारणा होत आहे. सामान्य करदात्याला कायद्याचा कोणताही त्रास होऊ नये ही एमसीसीआयची सरकारकडे मागणी आहे.