पुणे - पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नाल्यांच्या साफसफाई संदर्भात 3 दिवसीय मान्सूनपूर्व पूरनियंत्रण प्रभाग दौरा सुरू करण्यात आला. मात्र, अवघ्या महाराष्ट्रात सक्रिय झालेला मान्सून सध्या शहरात देखील बरसत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व दौऱ्यावर शहरातील नागरिक अनेक प्रश्न विचारत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पूरनियंत्रण दौरा; महापौर आणि आयुक्तांनी केली पाहणी
पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नाल्यांच्या साफसफाई संदर्भात 3 दिवसीय मान्सूनपूर्व पूरनियंत्रण प्रभाग दौरा सुरू करण्यात आला. मात्र, या मान्सूनपूर्व दौऱ्यावर शहरातील नागरिक अनेक प्रश्न विचारत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये मान्सूनपुर्व पुरनियंत्रण दौरा
गेल्या वर्षी शहराच्या अनेक भागात नद्यांचे पाणी शिरले होते. पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नद्या शहरातून जातात. त्यामुळे यावर्षी तरी मान्सूनपूर्व नियोजन होणे गरजेचे होते. या दौऱ्याची सुरूवात निगडी येथील महाराणा प्रताप गार्डन टिळक चौक येथून झाली. यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या महानगर पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.