पुणे- पूर्वी कोरोना विदेशातून आलेल्या नागरिकांपासून पसरत होता. पण, आता हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे. झोपडपट्टी भागातही पसरत आहे ही खूप गंभीर बाब आहे. हे पसरू नये यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये. सुरक्षित व सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
पुण्यात कोरोनामुळे 24 तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब असून लोकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. कोरोनाचा विखळा झोपडपट्टीच्या भागात पसरत चालला आहे. त्यामुळे प्रसार होण्याची आणखी जास्त भीती आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले.