महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात देशातील पहिले चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरू करणार - महापौर मुरलीधर मोहोळ - पुणे मनपा न्यूद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता तिसरी लाट या ही पेक्षा घातक असणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातं आहे. दुसऱ्या लाटेत अंदाज न आल्याने बेड, ऑक्सिजन, रेमिडिसीव्हीर इजेक्शन यांच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडाला तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याने पुण्यात देशातील पाहिलं चाईल्ड कोव्हिडं केअर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.

kovid child care center
महापौर मुरलीधर मोहोळ

By

Published : May 12, 2021, 1:10 PM IST

पुणे -कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास काहीशी सुरूवात झाली असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आला आहे. तिसरी लाट ही 3 ते 6 वर्षावरील बालकांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या माध्यमातून त्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. शहरातील अडीशेहुन अधिक बालरोगतज्ज्ञांशी चर्चा करुन पुण्यात देशातील पाहिलं चाईल्ड कोव्हिडं केअर हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

प्रतिक्रिया - महापौर मुरलीधर मोहोळ

देशातील पाहिलं चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरू करणार -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता तिसरी लाट या ही पेक्षा घातक असणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातं आहे. दुसऱ्या लाटेत अंदाज न आल्याने बेड, ऑक्सिजन, रेमिडिसीव्हीर इजेक्शन यांच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडाला तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याने पुण्यात देशातील पाहिलं चाईल्ड कोव्हिडं केअर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. आणि त्यासाठी ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पुण्यासाठी स्वतंत्र टास्कफोर्स -

या वर्षभरात पुणे महापालिकेच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लँट असेल विविध आरोग्य सुविधा असेल अश्या अनेक आरोग्याशी निगडित सर्व सुविधा वाढवण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेच नियोजन हे महापालिकेच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू असून या लाटेत आरोग्य कोणतीही आरोग्य व्यवस्था कमी पडू देणार नाही असं मत देखील यावेळी मोहोळ यांनी व्यक्त केले. तसेच ही संभाव्य लाट आल्यास बालरोग तज्ज्ञांशी भूमिका असल्याने महापालिकेकडून त्यांची पुण्यासाठी स्वतंत्र टास्कफोर्स नेमली जाणार आहे.

हेही वाचा -इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात व्हेंटीलेटरला आग; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

ABOUT THE AUTHOR

...view details