पुणे -भाताच माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात यावर्षी एक महिना उशिराने भाताची लागवड केली जात आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली, परंतु, जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांवर ( Farmers ) कृपादृष्टी दाखवलीय, त्यामुळं मावळात भात लागवडीची लगबग सुरु आहे. दरवर्षी मावळातील शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी मजुरांचा प्रश्न भेडसावत. पण यावर्षी यांत्रिकीकरणाद्वारे भात ( ( Rice sowing by modern machinery ) ) लागवड केली जात आहे.
हेही वाचा -Naxalites Making Missiles : इंटरनेट आणि युट्युब पाहून नक्षलवादी बनवत आहेत मिसाईल्स.. सापडले अवशेष
भात लागवड करणं झालं सोपं -कमी वेळेत जास्त क्षेत्रात भात लागवड करणं सोपं झालं आहे. शिवाय, मजुरांचा प्रश्न देखील सुटला आहे. उत्पन्न देखील 15 - 20 टक्के वाढणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे. मावळात शंभर हेक्टरमध्ये यांत्रिकीकरनाद्वारे भात लागवड केली जाणार असल्याच कृषी अधिकारी यांनी सांगितलं आहे. आधुनिक यंत्राची कास धरून मावळातील शेतकरी शेतातून अधिक उत्पन्न कस मिळेल याकडे सध्या भर देत आहेत.
कमी वेळेत जास्त क्षेत्रात लागवड -अगोदर तीन एकर शेतीत भात लागवड करायची असल्यास किमान 20 दिवस लागायचे. त्यात ही मजूर मिळणे अडचणीच ठरायच. परंतु, यांत्रिकी पद्धतीने भात लागवड केली जात असल्याने तीन दिवसात भात लागवडीचे काम होत आहे. कमी वेळेत जास्त क्षेत्रात लागवड होत आहे. त्यामुळं शेतकरी वर्ग आनंदी आहे. मावळच्या कृषी विभागाने भात लागवडीचे यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा -Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपद हिसकावल्यानंतर फडणवीसांवर केंद्राचा 'वॉच'; मर्जीतील अधिकाऱ्याकडे सोपवला कारभार