आळंदी(पुणे) - यंदा आषाढी वारीवर कोरोनाचे संकट आहे. आज अलंकापुरीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दुपारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाची विठाई बस तयार करण्यात आली असून २० वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
आषाढी वारी : माऊलींची पालखी अलंकापुरीतून आज पंढरीकडे होणार प्रस्थान - आळंदी माऊली पालखी बातमी
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आजोळ घरी म्हणजेच देऊळवाड्यात चौदा दिवसांचा मुक्कामाला होत्या. आषाढी वारीच्या परंपरेनुसार चौदा दिवस देऊळवाड्यात हरिनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या नादात भजन कीर्तनाचा सोहळा घेण्यात आला.
माऊलींची पालखी आज होणार पंढरीकडे प्रस्थान..
पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसचे एसटी बसचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मास्क हॅन्डग्लोज, असे साहित्य दिले जाणार आहे.
Last Updated : Jun 30, 2020, 1:10 PM IST