पुणे- ज्ञानोबा-तुकोबा, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीत दाखल झाली. यावेळी माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण करत स्वागत करण्यात आले. हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
येळकोट येळकोट जय मल्हार.! ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खंडेरायाच्या भेटीला - jejuri
ज्ञानोबा-तुकोबा, यळकोट यळकोट जय मल्लारच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीत दाखल झाली. यावेळी माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण करत स्वागत करण्यात आले. हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
सासवडहून सकाळी निघालेली माऊलींची पालखी आज जेजुरुरीत दाखल झाली. यावेळी जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णवांचा मिलाप झाला. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत १७ मुक्काम करुन जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस एक पर्वणीच असते. कारण आज त्यांना खंडोबाचे दर्शन होते. यावेळी यळकोट यळकोट जय मल्हारचाही जयघोष झाला.
जेजुरीत माऊलींच्या पालखीचे २ वेळा स्वागत केले जाते. स्वागताचा पहिला मान हा खंडोबा देवस्थानाचा असतो तर दुसरा मान हा जेजुरी नगरपालीकेचा असतो. माऊलींची पालखी ज्यावेळी गडावरच्या मंदिरासमोर खाली येते त्यावेळी पालखीवर भंडारा उधळला जातो.