दौंड (पुणे) -भिंतीच्या आडोशाला मटका जुगार खेळणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दौंड तालुक्यातील केडगाव येथे विशाल हॉटेल परिसरात करण्यात आली. यवत पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून १४ हजार ३९० रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
आरोपींमध्ये यांचा समावेश -
केडगाव गावच्या हद्दीत विशाल हॉटेलच्या भिंतीच्या आडोशाला मटका जुगार खेळताना आणि मटक्याच्या खेळ घेणारे एकूण ११ जण पोलिसांना आढळून आले. यात संतोष ज्ञानदेव नलवडे, दिलीप महादेव सूर्यवंशी हे संतोष भीमराव ताकमोगे याच्या सांगण्यावरून मटक्याचा खेळ घेताना आढळून आले. तसेच प्रताप अनिल शिवरकर, सुनील काळूराम बनकर, कैलास सदाशिव गायकवाड, संजय चांगदेव गाणे, हरिदास प्रकाश मोरे, बिभीषण बापूराव करडे, तुकाराम बाळू खरात, बाळासो गुलाब भंडलकर यांचाही त्यात समावेश आहे.
हेही वाचा -'महाराष्ट्राच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत'