महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याला आग.. आग्निशामक दल घटनास्थळी - वीज प्रकल्प

रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यातील वीज प्रकल्प व बाजुच्या परिसराला ही आग लागली आहे. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आग्निशामक दल, पोलीस आणि स्थानिक कामगार यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याला लागली आग.

By

Published : Sep 18, 2019, 12:57 PM IST

Updated : Sep 18, 2019, 1:58 PM IST

पुणे - शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात आज सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीसह धुराचे लोट मोठे असल्याने आगीवर अद्याप नियंत्रण मिळवता आले नाही.

घोडगंगा साखर कारखान्याला आग
रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यातील वीज प्रकल्प व बाजुच्या परिसराला ही आग लागली आहे. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आग्निशामक दल, पोलीस आणि स्थानिक कामगार यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याला यापूर्वीही आग लागल्याची घटना घडली होती. मात्र साखर कारखान्यात आग लागण्याच्या घटना होत असताना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचे समोर येत आहे.
Last Updated : Sep 18, 2019, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details