पुणे :पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथे रेनबो मॉलच्या सर्व्हिस रूममध्ये शॉर्ट सर्किटने ( Short circuit in the service room of Rainbow Mall ) आग लागल्याने एकच गोंधळ ( There was only confusion due to fire ) उडाला. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (There is fear among citizens ) होते. मॉलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बाहेर पडता आले नाही. धुरामुळे अनेकांना त्रास होत होता. अशा 20 ते 25 जणांना रेस्क्यू करून अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढल आहे.
Fire due to short circuit : मॉलला भीषण आग; अग्नीशमन दलाच्या प्रयत्नाने 20 ते 25 जणांचे प्राण वाचले
पिंपळे सौदागर येथे रेनबो मॉलच्या सर्व्हिस रूममध्ये शॉर्ट सर्किटने ( Short circuit in the service room of Rainbow Mall ) आग लागल्याने एकच गोंधळ ( There was only confusion due to fire ) उडाला. तब्बल चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
चार तासानंतर आगीवर नियंत्रण : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या रेनबो मॉलला भीषण आग लागली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली असून चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. मॉलच्या सर्व्हिस रुमध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याच प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. वल्लभ नगर, राहटणी येथील सात बंब घटनास्थळी दाखल होत तब्बल चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. काही जण धुरांच्या लोटांमुळे मॉलमध्ये अडकलेले होते. अशा व्यक्तींना रेस्क्यू करून अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे. अशी माहिती अग्निशन दलाच्या जवानांनी दिली आहे.