पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर सातत्याने राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. आत्ता शिवसेनेसह युवा सेनेकडून देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली जात (Mass Resignation of Yuva Sena Officers) आहे. युवा सेना सहसचिव शर्मिला येवलेसह ३५ पदाधिकाऱ्यांनी आज पदाचा सामूहिक राजीनामा दिला (Yuva Sena Joint Secretary Sharmila Yewle) आहे.
Mass Resignation of Yuva Sena Officers : युवा सेनेच्या 36 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा ; पक्षाकडून संधी दिली जात नसल्याचा आरोप - युवा सेनेचे पदाधिकारी
शिवसेनेसह युवा सेनेकडून देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली जात (Mass Resignation of Yuva Sena Officers) आहे. युवा सेना सहसचिव शर्मिला येवलेसह ३५ पदाधिकाऱ्यांनी आज पदाचा सामूहिक राजीनामा दिला (Yuva Sena Joint Secretary Sharmila Yewle) आहे.
फक्त पदाचा राजीनामा :राज्यातील हे 36 पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून पक्षात काम करत आहे. पक्ष वाढीसाठी गेल्या अनेक वर्षापासून काम आम्ही काम करत आहोत. पण पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून काम करू दिले जात नाही. तसेच प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केल जात आहे. आम्हाला पद दिले आहे, पण काम करू दिले जात नाही. म्हणून आम्ही सर्वांनी फक्त पदाचा राजीनामा दिला आहे. एक कार्यकर्ते म्हणून आम्ही पुढील काळात काम करू, असे यावेळी युवा सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी (Resignation of Yuva Sena Officers) सांगितले.
काम करू दिले जात नाही :आम्ही सर्वजण हे ग्रामीण भागातून आलो आहे. ग्रामीण भागात महिला सहसा राजकारणात येत नाही. पण असे असताना देखील आम्ही राजकारण आलो, आणि पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. पण आत्ता पक्षाकडून जरी पद देण्यात आले असले तरी काही नेत्यांकडून आम्हाला काम करू दिले जात नाही. असे देखील यावेळी येवले यांनी (Yuva Sena Officers) सांगितले.