पुणे - कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि एक नव्हे तर तीन लेयर मास्क लावून फिरवणाऱ्या ओमायक्रॉनच्या या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक मास्कची विक्री सर्वत्र झालेली पाहायला मिळाली. ( Mask Selling in Corona's Third Wave ) ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता एन95 मास्क तसेच थ्री लेयर मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तर तिसरी लाट ओसरल्यानंतर आज शहरात मास्कच्या विक्रीत तब्बल 90 टक्के घट झाली आहे. ( Mask Selling Decrease 90% Pune )
सॅनिटायझर वापरणे कमी -
कोरोनाच्या सुरुवातीपासून शासनाच्यावतीने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या तिन्ही गोष्टीचा वापर करावे, असे आवाहन केलं आहे. तरी आता तिसरी लाट ओसरल्यानंतर मास्कच्या विक्रीत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. तसेच सॅनिटायझर आणि कोरोना झालेल्या रुग्णाला लागलेल्या औषधोपचारातही मोठी घट झाली आहे. रुग्णसंख्या घटल्याने 'आता आपल्याला काहीच होणार नाही', अशा अविर्भावात गेल्या काही महिन्यांपासून पुणेकर शहरात वावरताना दिसत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रे ठेवणाऱ्या नागरिकांनी आता सॅनिटायझर वापरणे कमी केले आहे.