पुणे -पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील पी एम अंगडीया कार्यालयात पाच ते सहा जणांनी गोळीबार करून तब्बल 20 लाखांची रोकड लुटली होती. (robbery in market yard). या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडून टोळीतील सात आरोपींना अटक करण्यात आली असून चार जण अजूनही फरार आहेत. (Market yard robbery gang arrested).
Pune Crime : मार्केटयार्डमध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी - खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
गुन्ह्यातील संशयित आरोपी (Market yard robbery gang) हे पुणे जिल्ह्यातील मावळ येथे लपून बसले आहेत अशी बातमी मिळाली होती. पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमांना तालुक्यातील मोर्वेगाव येथील साई फॉर्म हाऊस मधून ताब्यात घेतले. (Market yard robbery gang arrested).
![Pune Crime : मार्केटयार्डमध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी Pune Crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16924955-thumbnail-3x2-marketyard.jpg)
आरोपींची फार्म हाऊस वरून अटक -मार्केट यार्ड येथे घटना घडल्या नंतर खंडणी विरोधी पथक १ मधील अधिकारी व स्टाफ यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. गोपनीय बातमीदारामार्फत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुणे जिल्ह्यातील मावळ येथे लपून बसले आहेत अशी बातमी मिळाली होती. पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमांना मावळ तालुक्यातील मोर्वेगाव येथील साई फॉर्म हाऊस येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता (२०), आदित्य अशोक मारणे (२८), दिपक ओम प्रकाश शर्मा (१९), विशाल सतीश कसबे (२०), अजय बापू दिवटे (२३), गुरुजनसिंह सेवासिंह विरक (२२), निलेश बाळू गोठे (२०) ही आहेत. त्यांनी त्यांच्या अन्य चार साथीदारांसह गुन्हा केला असल्याची कबूली दिली आहे. आरोपींकडून ११ लाख रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले सात मोबाईल, एक लोखंडी कोयता, गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहने असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.