महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Koyta Gang News : अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Market Yard Police Seized 18 Koyta

पुण्यात कोयता गँगच्या दहशतीने नागरिकांत भीती निर्माण होत आहे. कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास 3 हजारांचे बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे. तसेच पुण्यातील मार्केटयार्ड येथे अवैधरित्या कोयते बाळगणान्या दोन गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Pune Crime
अवैधरित्या कोयते

By

Published : Feb 2, 2023, 11:46 AM IST

पुणे : मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन इसम अवैधपणे कोयते बाळगत असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलीस यांना मिळाली होती. मार्केटयार्ड आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्याचेकडे 18 कोयते व एक रिक्षा जप्त करण्यात आली. त्या अनुशंगाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भवरसिंग भुरसिंग भादा, वय 35 वर्षे, राहणार गणेश नगर येरवडा पुणे तर गणेशसिंग हुमनसिंग टाक,वय 32 वर्षे, राहणार बालाजीनगर येरवडा यांना अटक करण्यात आले आहे.


पोलिसांकडून सापळा रचून पकडले :याबाबत सविस्तर माहिती अशी की, 1 फेब्रुवारी रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील एटीसीचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे दोन इसम रिक्षा क्र. एमएच 12 आरपी 7750 हिचेमध्ये अवैध्यरित्या कोयते विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीसांकडून सापळा रचून या इसमास ताब्यात घेण्यास सांगितले.



18 कोयते एक रिक्षा ताब्यात : मार्केटयार्ड आवेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड जवळ सापळा रचून बातमीदाराकडून अधिक माहिती घेतली. या दोन्ही इसमांना रिक्षासह आंबेडकरनगर गल्ली नं१ च्या आलीकडे रिक्षा स्टॅन्डच्या मागे ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी गणेशसिंग टाक याचे कमरेला एक लोखंडी कोयता सापडला. व आरोपी भवरसिंग भादा याच्या रिक्षाची बारकाईने पाहणी केली तेव्हा रिक्षाच्या मागील सिटचे मागे पिशवीमध्ये 17 कोयते सापडले. एकुण 18 कोयते एक रिक्षा असा एकुण 55,400/- रुपये किंमतीचा माल ताब्यामध्ये घेण्यात आला. याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी नवीन युक्ती :गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत मजावली आहे. पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करून कोयता गँगची दहशत काय कमी होत नाही. विशेष म्हणजे या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आत्ता पुणे पोलिसांनी नवीन युक्ती आखली आहे. आत्ता या पुढे शहरात कुढेही कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा:Pune News आत्ता कोयता खरेदीसाठी द्यावं लागणार आधार कार्ड पुणे पोलिसांचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details