महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठी राजभाषा दिन..! तरुणीने तयार केल्या 'अक्षरांच्या चकल्या'

'मराठी भाषा दिनानिमित्त लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी मराठीच्या अक्षर चकल्या केल्या आहेत. कुठलीही भाषा अक्षरापासून तयार होते. त्यामुळे अक्षरांच्या चकल्या खाल्ल्याने लहान भाषेची गोडी लागेल', असे मत श्रुतीने व्यक्त केले.

marathi-bhasha-day-girl-made-alphabet-chaklya-in-pune
तरुणीने तयार केल्या 'अक्षरांच्या चकल्या'

By

Published : Feb 28, 2020, 9:43 AM IST

पुणे- कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा होतो. काल (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात देखील मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यात शहरातील एका तरुणीने मराठी अक्षरांच्या चकल्या तयार करुन एका अनोख्या पद्धतीने मराठी दिन साजरा केला. त्यामुळे लहान मुलांना अक्षरांची गोडी लागेल अशी प्रतिक्रिया तरुणीने दिली आहे. श्रुती गावडे असे त्या तरुणीचे नाव असून ती मोडी लिपीची अभ्यासक आहे.

तरुणीने तयार केल्या 'अक्षरांच्या चकल्या'...

हेही वाचा-मराठी भाषा गौरव दिन : माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत

'मराठी भाषा दिनानिमित्त लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी मराठीच्या अक्षर चकल्या केल्या आहेत. कुठलीही भाषा अक्षरापासून तयार होते. त्यामुळे अक्षरांच्या चकल्या खाल्ल्याने लहान भाषेची गोडी लागेल', असे मत श्रुतीने व्यक्त केले.

महाराष्ट्रातील मुलांना मराठी लिहिता, बोलता, वाचता येणे फार महत्वाच आहे. सध्या इंग्रजी भाषेची गोडी अनेकांना लागली असली तरी तेवढीच मराठीचीही गोडी लागावी म्हणून अनेक पालक प्रयत्न करतात. मात्र, सध्य स्थितीला अनेक मुले हे इंग्रजी शाळेत शिकतात. त्यामुळे मराठी बोलण्याची गोची होते. त्यामुळे श्रुतीने अक्षरांच्या चकल्याच्या माध्यमातून लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून केलेला प्रयत्न हा यशस्वी होवो.

ABOUT THE AUTHOR

...view details