महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात

'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद' यांसारख्या यशस्वी सिनेमांचे लेखक, दिग्दर्शक आणि 'रेगे', 'फर्जंद' यांसारख्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते प्रविण तरडे यांच्या कारला रात्री 11 वाजता सासवडजवळ अपघात झाला. यावेळी अभिनेते रमेश परदेशी, विशाल चांदणे त्यांच्या सोबत होते.

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात

By

Published : Aug 28, 2019, 3:13 AM IST

पुणे- 'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद' यांसारख्या यशस्वी सिनेमांचे लेखक, दिग्दर्शक आणि 'रेगे', 'फर्जंद' यांसारख्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते प्रविण तरडे यांच्या कारला रात्री 11 वाजता सासवडजवळ अपघात झाला. यावेळी अभिनेते रमेश परदेशी, विशाल चांदणे त्यांच्या सोबत होते.

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात

सासवड जवळील हिवरे गावातून येत असताना महादेव मंदिराजवळ एका अवघड वळणावर गाडीने रस्ता सोडला. ब्रेक दाबून गाडी कशीबशी कंट्रोल केली. मात्र ती बाजूच्या झाडाला धडकली. ही घटना घडली तेव्हा अभिनेते रमेश परदेशी गाडी चालवत होते. प्रवीण तरडे त्यांच्या शेजारी बसले होते, तर कार्यकारी निर्माते विशाल चांदणे हे मागील सीटवर बसले होते. फक्त नशीब बलवत्तर आणि गाडीला एअर बॅग्स असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात
दरम्यान, सासवड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत अपघाताची नोंद केली आहे. अपघातानंतर प्रविण तरडे, रमेश परदेशी आणि विशाल चांदणे हे रात्री उशिरा पुण्यात पोहोचले आहेत. याबाबत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तरडे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details