बारामती Manoj Jarange Patil Baramati Sabha :मंडल आयोगानं ज्या जाती ओबीसीमध्ये घेतल्या, कायद्यानं जेवढ्या जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या आहेत, त्या सर्व जातीचा समावेश पोटजाती म्हणून आहे. मग मराठ्यांची पोटजात कुणबी का नाही?', असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. तसंच मराठा समाजातील जे गरजू नाही, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नसल्यास घेऊ नये, अन्यथा गप्प बसावं. मराठ्यांशी गद्दारी नको, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे.
22 ऑक्टोबरनंतर आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करु :राज्य सरकारकडं आरक्षणाच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडं मराठीत उत्तर आहे, पण सरकारकडं नाही. मराठ्यांनी सरकारला वेळ मागितली नाही, सरकारनं मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ मागितलाय. जर आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर २२ तारखेला आंदोलनाची पुढील दिशा समजेल. तसंच कुणबीला सुधारित शब्द शेती आहे. आम्ही शेती कसतो, जगाला रोजीरोटी पुरवतो, शेती करतो म्हणून आम्ही कुणबी. त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु करावी. ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्यावं, अन्यथा नको असल्यास गप्प बसावं, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.