पुणे Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. आता त्यांची तब्येत बिघडली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू राहणार, अशी भूमिका त्यांनी घेतलीय. त्यांच्या या भूमिकेनंतर खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार का? यावर कायदेतज्ञ असिम सरोदे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.
मराठा समाजाला आरक्षण :सरोदो म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत आधी उच्च न्यायालयानं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं हा प्रश्न कायदेशीर दृष्टीने लॉक केलाय. त्यांनी एक निर्णय दिलाय की, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू शकत नाही. याबाबत अनेक याचिका देखील झाल्या. त्यावर न्यायालयानं देखील हाच निकाल दिलाय. सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, हे कोर्टाने ठरवलं आहे. आत्ता यात जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल, तर याबाबत फक्त राजकारण केलं जातंय. हा विषय फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्र सरकारनं जर एखादी संविधानिक सुधारणा केली किंवा यासाठी वेगळा कायदा केला की, आम्ही ही मर्यादा वाढवून 65 टक्के करत आहोत. तरंच आरक्षण हे सुकर पद्धतीनं मिळू शकतं, असं यावेळी सरोदे म्हणाले. (Maratha Reservation Asim Sarode reaction)