ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी भाजपचे षडयंत्र; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप - उदयनराजे

मराठा क्रांती ठोक मोर्चाची पत्रकार परिषद आज (मंगळवारी) पुण्यात पार पडली. यावेळी उदयनराजेंना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्यांची आहे. जर महाराजांचा पराभव झाला, तर राज्यात हाहाकार माजेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला.

उदयनराजे भोसले
author img

By

Published : Sep 24, 2019, 4:12 PM IST

Updated : Sep 24, 2019, 4:38 PM IST

पुणे - सरकार उदयनराजेंची फसवणूक करीत आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज सरकारवर नाराज आहे. म्हणून उदयनराजेंचा भाजपप्रवेश करवून घेतला. उदयनराजेंना पाडण्याचे षडयंत्र सरकारकडून रचले जात आहे. असे झाले तर सरकारचा दहावा घालू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाची पत्रकार परिषद आज (मंगळवारी) पुण्यात पार पडली.

मराठा क्रांती ठोक मोर्चाची पत्रकार परिषद आज (मंगळवारी) पुण्यात पार पडली. यावेळी ठोक मोर्चाचे राज्य समनवयक संजय सावंत यांच्यासह महेश डोंगरे, बबन सुद्रीक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय सावंत म्हणाले, नाशिकच्या सभेत उदयनराजेंना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. उदयनराजे मराठा समाजाचे राजे आहेत. त्यांना अशी वागणूक दिलेली मराठा समाज सहन करणार नाही. उदयनराजेंना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्यांची आहे. जर महाराजांचा पराभव झाला, तर राज्यात हाहाकार माजेल.

हेही वाचा - शरद पवारांची एक रॅली अन् सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर ?

मराठा आरक्षणाला विरोध करण्याऱ्या नेत्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रचार करणार आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या पंकजा मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर यांना मराठा समाज जागा दाखवेल. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 42 जण हुतात्मा जण झाले आहेत. सरकारने त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि दहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अद्यापही पाळले नाही. त्याचबरोबर तेरा हजारहुन अधिक आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही सरकारने पाळले नाही, असा आरोपही संजय सावंत यांनी यावेळी केला.

हेही वाचा - जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंच्या पदरात नेमकं काय ?

Last Updated : Sep 24, 2019, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details