पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 11 ऑक्टोबर आणि 22 नोव्हेंबर रोजी होणारी एमपीएससी परीक्षा रद्द करा, अन्यथा परीक्षा केंद्रे उद्ध्वस्त करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
एमपीएससी परीक्षा रद्द करा, अन्यथा परीक्षा केंद्रे उद्ध्वस्त करण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - pune latest news
सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावरील स्थगितीमुळे मराठा समाजातील तरुण हतबल झालेला आहे. या संभ्रमाच्या आणि गोंधळाच्या वातावरणात मराठा आरक्षणाविना परीक्षा घेणे म्हणजे मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासारखे होईल, असे सांगत ही परीक्षा रद्द करा, अन्यथा परीक्षा केंद्रे उद्ध्वस्त करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.
एमपीएससीच्या माध्यमातून राजपत्रित आणि अराजपत्रित तसेच इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या जाहिराती आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती पूर्वीची असून संबंधित अर्जामध्ये एसईबीसीअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीमधील एसईबीसीच्या आरक्षणावर सरकारची भूमिका जाहीर न करताच ही परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे. या परीक्षा देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून ही परीक्षा त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावरील स्थगितीमुळे हा मराठा तरुण हतबल झालेला आहे. या संभ्रमाच्या आणि गोंधळाच्या वातावरणात मराठा आरक्षणाविना परीक्षा घेणे म्हणजे मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासारखे होईल, असे सांगत, या परीक्षा रद्द करा, अन्यथा परीक्षा केंद्रे उद्ध्वस्त करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.