पुणे - महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे, केवळ खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे. ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रश्न तत्काळ मार्गी लागले नाही तर येत्या नऊ ऑगस्टला महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर सर्व मराठा बांधव ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला. ते पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने २०१८ मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. त्यामध्ये ४२ बांधवांचे प्राण गेले. म्हणून त्या ४२ मराठा बांधवानच्या कुटुंबाना १० लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी राज्य सरकारने द्यावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला.