महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde : छत्रपती संभाजी महाराज जयंती शासकीय कार्यालयात होणार साजरी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार - Maratha Coordination Committee

छत्रपती संभाजी महाराज यांची आता शासकीय स्तरावरही जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले आहे.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री यांचे मराठा समन्वयक समितीकडून आभार

By

Published : Jan 20, 2023, 2:13 PM IST

Updated : Jan 20, 2023, 3:03 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठा समन्वयक समितीकडून आभार

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीकडून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील नागरिकांची आणि विविध संघटनाची ही मागणी केली होती की, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीयस्तरावर साजरी केली जावी. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी. परंतु या मागणीला हवा तसा प्रतिसाद राज्यकर्त्यांकडून भेटत नव्हता. परंतु आता शिवप्रेमींना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रमध्ये सातत्याने राजकारण : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सातत्याने राजकारण केले जाते. त्या सर्व राजकारणाला अनुसरून हा निर्णय होत नव्हता असे अनेक संघटनांना वाटत होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीचे अभावामुळे हे इतके दिवस करता आले नाही. राज्यामध्ये सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्याबद्दल मुख्यमंत्री यांचे महाराष्ट्रातील शिवप्रेमी , मराठा प्रेमी आणि संभाजी महाराजांवर प्रेम करणारे संभाजी महाराजांना मानणाऱ्या सर्वच लोकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.



कार्यालयात जयंती साजरी होणार :छत्रपती संभाजी महाराज यांचे महापुरुषांच्या यादीत नाव टाकून त्यांची यापुढे 14 मे प्रत्यक्ष कार्यालयात जयंती साजरी करण्यात येणार आहे. तसे आदेश शासकीय स्तरावरून जाहीर करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक दिवसापासून मागणी होती. शंभू प्रेमी, शिवप्रेमी आणि मराठा संघटनेची ती मागणी मान्य झाल्याने आम्ही जाहीरपणे राज्य सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचे आमच्या संघटनेतर्फ जाहीर आभार मानतो, असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीची महेश डोंगरे यांनी म्हटले आहे.



महाराष्ट्रातअधिवेशनामध्येही चर्चा झाली : महाराष्ट्रमध्ये छत्रपती संभाजी महाराज , स्वराज्य रक्षक धर्मवीर यावर महाराष्ट्रातल्या अधिवेशनामध्ये यावर खूप चर्चा झाली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधाकात असा संघर्षही निर्माण झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणे, त्यांच्याविषयी भावना व्यक्त करणे राजकारणाचा भाग होत होता. त्यातच आता प्रखर बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन सरकार स्थापन केलेले एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी सरकार म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis Reaction त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Last Updated : Jan 20, 2023, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details