पुणे - आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री भेटू शकत नसल्याने पुण्यातील कौन्सिल हॉल येथे राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत आक्रोश आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी हे कार्यकर्ते मुख्य सचिवांना निवेदन देणार आहेत. मुख्य सचिवांकडून काय आश्वासन मिळते, त्यावर पुढची दिशा ठरवली जाईल, असे या आंदोलकांकडून सांगण्यात आले.
मराठा आक्रोश आंदोलन : कार्यकर्त्यांची पुण्यात मुख्य सचिवांशी बैठक
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पंढरपूरहून मुंबई येथे पायी वारी करत आक्रोश आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पंढरपूर येथे पायी वारी करण्यास सरकारने मज्जाव केला होता.
आक्रोश आंदोलन कार्यकर्ते कौन्सिल हॉल याठिकाणी येणार असल्याने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त पुण्यातल्या कौन्सिल हॉलबाहेर ठेवण्यात आला होता. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पंढरपूरहून मुंबई येथे पायी वारी करत आक्रोश आंदोलन करण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाचा होता. पण कार्यकर्त्यांना पंढरपूर येथे पायी वारी करण्यास सरकारने मज्जाव केला होता. त्यानंतर पंढरपूरहून कारने या आक्रोश आंदोलनातील काही कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तात पुण्यात दाखल झाले.
हेही वाचा -'देशात गोडसेचे भक्त जास्त, तर गांधींचे अनुयायी कमी झालेत!'